बुलढाणा: ‘समृद्धी’वरील सोने लुट प्रकरणातील 6 आरोपींची पुन्हा मागितली पोलीस कस्टडी, आरोपींना मेहकर कोर्टात केले हजर
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मेहकर जवळच्या फरदापुर टोल नाक्या नजीक 22 ऑगस्टच्या सायंकाळी मुंबई येथील सोने व्यापाऱ्याकडून पावणे पाच किलो सोने लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी मेहकर पोलीस व बुलढाणा एलसीबीच्या पथकांने 6 आरोपीना अटक केली असून जवळपास अडीच किलो सोने जप्त करण्यात आले आहे.आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यासाठी मेहकर पोलिसांनी 6 आरोपींना कोर्टात हजर करून पुन्हा पोलिस रिमांड मागितला आहे.