नेवासा: नगरपंचायत प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर ; इच्छुकांना धक्का !
नेवासा नगरपंचायत निवडणूक आरक्षण सोडत बुधवार ८ ऑक्टोंबर रोजी तहसिल कार्यालयालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी प्रभागनिहाय अनुसुचित जाती पुरुष ,अनुसुचित जमाती महिला व पुरुष, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला व पुरुष आरक्षण सोडत जाहीर केली.