सोनपेठ ट्वेन्टीवन शुगर या कारखान्याने चालू हंगामासाठी पहिली उचल प्रतिटन 3,000 रुपये जाहीर करावी, तसेच मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसासाठी जाहीर करण्यात आलेला 2,700 रुपयांचा दर पूर्णत: अदा करावा, अश्या विविध मागण्यांसाठी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी 1 डिसेंबरपासून कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू असून आज बुधवार 3 डिसेंबर रोजी दुपारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी या आंदोलनास किसान सभेचे अध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर, ओंकार पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे आदींनी भेट दिली.