धरणगाव: धरणगावातील त्या महिलेला आश्रय येणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; राष्ट्रीय सुरक्षा मंचचे पोलीसांना निवेदन
धरणगाव शहरातील सराई मोहल्ला परिसरात एका इराणी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर आता हे प्रकरण अधिक गंभीर वळणावर पोहोचले आहे. या महिलेला वर्षभरापासून आपल्या घरात आश्रय देणारे स्थानिक नागरिक रफिक मुसा कुरेशी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी 'राष्ट्रीय सुरक्षा मंच' धरणगाव यांनी गुरूवारी ८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता धरणगाव पोलीस प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केले आहे.