यवतमाळ: ढाणकी नगरपंचायत निवडणुकीसाठी अभेद्य पोलिस सुरक्षा कवच
ढाणकी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अडथळा न येता मतदान शांततेत व सुरळीत पार पडावे, यासाठी बिटरगाव पोलिस ठाण्याकडून कडेकोट बंदोबस्त उभा करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार अत्यंत व्यूहरचित पद्धतीने पोलिस फोर्सची विभागणी करण्यात आली असून संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे.