साकोली: सराटी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डयामुळे मा.सरपंच पवन कुमार शेंडे यांचा झाला अपघात
राष्ट्रीय महामार्गावरून सराटीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे.या खड्ड्यात पाणी भरल्याने सोमवार दि 15सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता गुडरी सराटीचे माजी सरपंच पवन कुमार शेंडे यांच्या खड्डा लक्षात न आल्याने मोटरसायकल खड्ड्यात जाऊन त्यांचा अपघात झाला त्यांच्या पायाला जखम झाली असून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करणारे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना गावकऱ्यांनी दिले आहे