तेल्हारा: हिवरखेड नगरपरिषद मध्ये चौरंगी लढत तर नगरसेवक पदासाठी 106 उमेदवार रिंगणात उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंची सभा
Telhara, Akola | Nov 28, 2025 तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नगरपरिषद मध्ये चुरशीची लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान नगरपरिषद उमेदवारांमध्ये प्रमुख चार पक्षांमध्ये चौरंगी लढत होणार आहे तर दहा प्रभागाच्या वीस नगरसेवक निवडून द्यायच्या जागेसाठी 106 उमेदवार रिंगणात आहेत दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिवरखेड येथे उद्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत यासाठी महत्त्वपूर्ण सभेचे आयोजनही करण्यात आलं आहे.