जालना येथील कंपनीतील १८ वर्षांपासून कार्यरत असलेल्या चालकाने कर्जबाजारीपणामुळे मालकाचेच २७ लाख रुपये लुटले. गणेश शिंदे आणि त्याचा मुलगा अमोल शिंदे यांनी बनावट हल्ला करून पैशांची बॅग पळवली. पोलिसांनी केवळ १० तासांत दोघांना अटक करून २५ लाख रुपये जप्त केले. पत्नी आजारी असणे आणि जुगारातील कर्जामुळे हा कट रचल्याचे समोर आले.