भिवंडी: भिवंडी येथे रिक्षा आणि कंटेनरची टक्कर
Bhiwandi, Thane | Oct 16, 2025 आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास भिवंडी येथे एक भीषण अपघात झाला आहे. भिवंडी येथे अंजुर फाटा रोडवर एका कंटेनर ने एका रिक्षाला धडक दिली आहे. या अपघातामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षा चालक देखील जखमी झाला आहे. अपघातानंतर रिक्षा चालकाला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालक हा विरुद्ध दिशेने येत होता त्यामुळे हा अपघात झाला. या प्रकरणात वाहतूक पोलीस तपास करत आहेत.