विक्रमगड: दुचाकी आणि ट्रेलरचा खुपरी नजीक भीषण अपघा; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
वाडा भिवंडी महामार्गावर खुपरी नजीक दुचाकी आणि ट्रेलर चा भीषण असा अपघात घडला आहे. बिलोशी येथील कंपनीत कार्यरत असलेला तरुण दुचाकीवरून जात होता. रस्त्यावरील खड्ड्यांमधून वाट काढत असताना अचानक दुचाकी वरील तरुणाचा तोल गेला आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली दुचाकी स्वार तरुण चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. स्मित पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.