कळमनूरी: कामठा फाटा शिवारात दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक,एकाचा मृत्यू,आ.बाळापूर पोलिसात दुचाकी चालकावर गुन्हा
अरविंद गुलाबराव शेळके व 33 वर्ष राहणार मरडगा ता . हदगाव जि.नांदेड हे आ .बाळापूर कडून कामठा फाटा ते हदगाव या रस्त्यावर दि.7 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास दुचाकी क्र.एम एच 26 ए एक्स 3480 वरून जात असताना कामठा फाटा शिवारात दुचाकी क्र .एमएच 38 ए जे 6583 च्या चालकांने आपली वाहन भरधाव वेगात चालवून त्यांच्या दूकीला पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे .या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने बाळापूर पोलिसात सदर दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .