शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहार, गणवेश वितरण तसेच शिक्षक उपस्थितीबाबत सुरू असलेल्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आज सकाळी एका तरुणाने जिल्हा परिषद कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सोमवार दि. 3 नोव्हेंब 2025 रोजी दुपारी 1 वाजता ही घटना घडली. कदीम जालना पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला असून शकील नजीर पठाण असे या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील काही शाळेचा प्रश्न आहे.