महाबळेश्वर: राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे महाबळेश्वर येथे आगमन; जिल्हा प्रशासनाने केले स्वागत
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे दोन दिवसीय सातारा जिल्हा दौऱ्यावर महाबळेश्वरच्या राजभवनावर शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता आगमन झाले. पोलीस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के यांनीही राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.