धरणगाव: पाळधी गावातील तरूण झाला बेपत्ता; धरणगाव पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील २६ वर्षीय तरूण हा दुध जमा करण्यासाठी जात असल्याचे सांगून शनिवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता धरणगाव पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तुकाराम संतोष जोगी वय २६ रा. पाळधी ता.धरणगाव असे बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे.