आज दिनांक 28 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी सकाळी 8वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन ता. मेहगाव येथे काल दि.27 जानेवारी 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास 55 वर्षीय मंगलाबाई ईश्वर उसारे रा.मेहगाव येथे शेत शिवारात विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली,यावेळी सदर महिलेला पोलिसांनी व नातेवाईकांनी धावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले महिलेवर शवविच्छेदन याच प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यासाठी दाखल केले आहे, पुढील तपास पोलीस करत आहे.