समुद्रपूर: गिरड येथिल प्राचीन श्रीराम मंदिरांतून सायंकाळी निघाली १३९ वी सुप्रसिद्ध घोडा यात्रा
गिरड प्राचीन श्रीराम मंदिरातून दरवर्षीच्या परंपरे नुसार बुधवारी १७ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता मंदिरातुन १३९ वी भव्य प्रसिध्द घोडा याञा काढण्यात आली या घोडा याञेत परीसरातील भजन मंडळी शामिल झाले बँड बाजे आणि विवीध झॉकीयाचे सोबत ही घोडा याञा गिरड गावाचे मुख्यमार्गाने निघाली या वेळी ह्या घोडा याञे सोबत गावातिल व बाहेर गावा वरुण आलेले हजारो राम भक्त सहभागी झाले होते.यावेळी या घोडा याञेचे ठीक ठिकाणी उत्साहत स्वागत करण्यात आले ,तर जिकडे तिकडे गिरड गावचे वातावरण राममय झाले आहे.