समुद्रपूर: रासा येथे अखंड भागवत सप्ताह समारोपानिमित्त गावातून काढली दिंडी शोभायात्रा
रासा येथे हनुमान मंदीर देवस्थान कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने ७ दिवसीय अंखड भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गुरुवारी १८ एप्रिलला दुपारी १२ वाजता सप्ताह समाप्ती निमित्ताने विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी शोभायात्रा काढण्यात आली. व नंतर ह. भ. प. अंजली शिंदे यांच्या अमृतवाणीने समारोप करण्यात आला.