समुद्रपूर: फरीदपुर येथे मगन संग्रहालयाकडून घेण्यात आली खरीप हंगाम पूर्व शेतीविषयक महिला व पुरुष शेतकऱ्यांची बैठक
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथील मगन संग्रहालयाच्या माध्यमातून फरीदपुर गावातील शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते आहे. त्यानुसार गुरुवारी १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रगतिशील शेतकरी चक्रधर भगत, मगन संग्रहालयाचे विष्णू बाम्रणवाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगाम पूर्व शेतीविषयक मार्गदर्शन केले.