पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या मुलीने महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालय येथे केला दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 29, 2025
आज सोमवारी 29 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, पालकमंत्री संजय शिरसाठ यांची मुलगी हर्षदा संजय शिरसाठ यांनी आज रोजी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी कार्यकर्त्यांसह सदरील उमेदवारी अर्ज आज रोजी दाखल करण्यात आला आहे, तर शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मुलाने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावेळी खासदार संदिपान भुमरे आमदार प्रदीप जैस्वाल यांची उपस्थिती होती.