गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात ग्रामसभांचे आयोजन 17 सप्टेंबर रोजी , मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रारंभ- एम. मुरूगानंथम
Gondiya, Gondia | Sep 16, 2025 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे पुरस्कार अभियान राबविण्याचा संकल्प घेण्यासाठी जिल्ह्यात बुधवारी 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सुमारे 548 ग्रामपंचायतींमध्य या विशेष ग्रामसभांचे आयोजन होणार असून आपल्याच ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळायला पाहिजे यासाठी ग्रामपंचायतिही सज्ज झाले आहेत परिणामी लोकसहभागातून हे पुरस्कार मिळवण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी कंबर कसली आहे.