पंढरपूर: थकीत ऊस बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांचे भोसे येथे कृषिराज कारखान्याच्या चेअरमनच्या घरासमोर ठिय्या आंदोलन
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील कृषिराज साखर कारखान्याच्या थकीत वसुलीसाठी पंढरपूर तसेच माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज, मंगळवार दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजता कारखान्याचे चेअरमन गणेश पाटील यांच्या घरासमोर आंदोलन छेडले. या आंदोलनावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोठ्या आवाजात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.