जळकोट: बेळसांगवी येथे भगिनीने आ. रोहित पवार यांची घेतली भेट.. मांडली अतिवृष्टीची व्यथा
Jalkot, Latur | Oct 2, 2025 लातूर जिल्ह्यातील बेळसांगवी (ता. जळकोट) इथं अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना केरुबाई काशिनाथ सोमवंशी या भगिनीच्या शेतात भेट दिली.. एका बाजूला घरातली कर्ता व्यक्ती गेल्याचं दुःख सावरत असतानाच दुसऱ्या बाजूने अतिवृष्टीने शेतातील तूर, सोयीबीनच्या माध्यमातून हातातोंडाशी आलेला घासही हिरावून नेला.. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, त्याप्रमाणे शिल्लक राहिलेली एकेक शेंग त्या साडीच्या पदरात वेचत होत्या…