मोहाडी: करडी रस्त्यावर मोटरसायकलने हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध करडी पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी तालुक्यातील करडी येथे दि. 25 डिसेंबर रोज शुक्रवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास करडी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मोटरसायकलने हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत आरोपींच्या ताब्यातील मोटरसायकल क्र.MH 35 AY 6684 तसेच 100 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रितिक खरोले व खुशाल मंडाले दोन्ही रा. तिरोडा असे आरोपींची नावे असून दोन्ही आरोपीविरुद्ध करडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.