चिखलदरा तालुक्यातील एकझीरा येथे शेतात घरबांधकामाच्या कारणावरून झालेल्या वादातून पती पत्नीवर दिनांक २५ रोजी दुपारी १२:३० वाजता हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी सहा जणांविरुद्ध चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी रमेश रामा चिमोटे (वय ३९रा. एकझीरा हे घरगुती काम करीत असताना आरोपींनी जबरदस्तीने घरासमोर येऊन वाद घातला.“तुम्ही मला शेतात घर का बांधू देत नाही, आम्ही शेतातच घर बांधणार, यावर फिर्यादीने आमच्या शेतात तुम्ही कसे घर बांधताय असे म्हटले.