कन्नड: दिवाळी गेली तरी शेतकऱ्यांना भरपाई नाही, मिळेल तरी कधी? — माजी आमदार हर्षवर्धन जाधव
दिवाळी उलटून गेली तरीही शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, सरकार केवळ घोषणाच करत असल्याची टीका माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि २८ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता केली. ते स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देऊ, असे त्यांनी सांगितले. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रायभान जाधव विकास आघाडीला मतदान करून ताकद द्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.