दिग्रस: दिग्रस तालुक्यातील अरुणावती कॉलनी जवळील दिव्यांग कार्यकर्त्याच्या दुकानाला भीषण आग, ४ लाखांचा मुद्देमाल जळून खाक
दिग्रस तालुक्यातील अरुणावती कॉलनीजवळ दिव्यांग बांधवांच्या उपजीविकेचा आधार असलेल्या पंचर दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन सोरते यांच्या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गजानन सोरते हे दररोजप्रमाणे बुधवारी संध्याकाळी ६ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान आग लागली.