भंडारा तालुक्यातील शहापूर-नागपूर महामार्गावरील पेट्रोलपंप (ठाणा) शिवारात दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास एका भरधाव बोलेरो पिकअपचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये मिरची तोडणीसाठी जाणाऱ्या २० महिला मजूर जखमी झाल्या. शहापूरहून नागपूरच्या दिशेने मजूर घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप (क्र. MH 40/DC-1981) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकाला धडकले. या अपघातात अनिता धोतरे (४०), शारदा ठवकर (३०), जसुदा गोंधुळे (७०), सुनिता सपाटे (६५), शारदा मेश्राम (३५), शीला वैद्य (६५)....