खुशीपार नानक ढाब्याजवळ अवैध दारू बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ताब्यात घेतले. आरोपी गोमा सकटु कुरसुंगे (६५) रा. सहाकेपार, ता. अर्जुनी-मोरगाव याच्या पानटपरीतून देशी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), ७७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.