नागपूर महानगरपालिका निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा राजीनामा नामंजूर केला असल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पेठे यांचा राजीनामा फेटाळण्यात आला.