धुळे: जय हिंद व एसएसव्हीपीएस कॉलेज परिसरात २२ अल्पवयीन चालकांवर कारवाई करत तब्बल दीड लाखांचा दंड वसूल
Dhule, Dhule | Nov 10, 2025 धुळे पोलीस प्रशासनाने अल्पवयीन आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर धडक कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, वाहतूक शाखेने जय हिंद कॉलेज आणि एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयाजवळ मोहीम राबवून २२ अल्पवयीन चालकांना पकडलं. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे बेफिकीरपणे वाहन चालवणाऱ्या तरुणांना चाप बसेल, अशी माहिती एपीआय प्रशांत महाले यांनी दिली.