वैजापूर: चांडगाव शिवारात विद्युत तारांच्या घर्षणाने आग लागून शेतातील दीड एकर पीक जळून खाक
विद्युत तारांचे घर्षण होऊन शेतात आग लागून पिकाचे नुकसान झाल्याची घटना तालुक्यातील चांडगाव शिवारात गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गट क्रमांक 58 मध्ये घडली.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अर्जुन पांडुरंग रहाणे व परमेश्वर नारायण रहाणे यांची शेती या गुरुवारी विद्युत तारांचे घर्षण होऊन झालेल्या स्पार्किंगमुळे आग लागली आगीमध्ये या दोन्ही शेतकऱ्याचे दीड एकर पीक जळून खाक झाले आहे.तत्काल पंचनाम करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.