वाशिम: जिल्ह्यात ई पिक पाहणी नोंदणीसाठी मिळाली मुदतवाढ आता 20 सप्टेंबर पर्यंत करता येणार ई पी पाहणी ची नोंद
Washim, Washim | Sep 14, 2025 जिल्ह्यामध्ये सध्या शेतकऱ्यांकडून इ पीक पाहणी नोंद मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात येत असून या नोंदी शिवाय पेऱ्याचा उतारा सातबारावर नोंदवल्या जात नाही तसेच कोणतेही अनुदान अथवा नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे पाहणी ची नोंद करणे आवश्यक असून ही नोंद करण्याचा शेवटचा दिवस 15 सप्टेंबर आहे. परंतु ॲप मध्ये आलेली प्रॉब्लेम आणि इतर काही कारणामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या ई पिक पाहनीची नोंद करणे बाकी असल्याने राज्याच्या कृषी विभागाने या इ पीक पाहणी नोंदणीची मुदत दि. 20 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे.