धुळे: नवे भदाणे येथील तरुणाची आत्महत्या; चव्हाण विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Nov 2, 2025 धुळे तालुक्यातील नवे भदाणे गावात एका एकोणीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीन मधुकर श्रीराम वय १९ असे मयत तरुणाचे नाव असून, त्याने ३१ ऑक्टोबर रोजी गावातील गावठाण जागेवर गळफास घेऊन आपले जीवन संपवले. याप्रकरणी, मयत नितीनच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे धुळे तालुका पोलीस ठाण्यात १ नोव्हेंबर रोजी चार जणांना विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.