चांदूर रेल्वे होमगार्ड पथकात होमगार्डचा ७९ वा वर्धापन दिन सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (भा.पो.से.) यांच्या आदेशाने व केंद्रनायक दीपक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.वर्धापन दिनानिमित्त चांदूर रेल्वे पथकाने साप्ताहिक परेडसह भव्य पायदळ रॅलीचे आयोजन केले. ही रॅली पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथून सुरू होऊन सिनेमा चौक, बाळासाहेब ठाकरे चौक, रेल्वे स्टेशन चौक, शहरातून विविध मुख्य रस्त्याने काढली.