देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रसादनगर येथील सार्वजनिक शौचालयांची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता शौचालयात साठलेला मैला वाजत-गाजत नगरपरिषद कार्यालयात टाकणार, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या निवेदनाच्या प्रती संबंधित प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.