उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनावले खडे बोल;जिल्हा रुग्णालय कार्डियाक कॅथ लॅबचे उदघाटन
Beed, Beed | Sep 17, 2025 बीड जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक कॅथ लॅब युनिटचे उद्घाटन आज बुधवार दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता, करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.दरवाज्यांचे स्क्रू व्यवस्थित न बसवणे, रंगकाम नीट न करणे, लाईट फिटिंग आणि भिंतींच्या टचपची कमतरता, तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष – अशा मुद्द्यांवरून त्यांनी गुत्तेदाराला जाब विचारला.यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले की, रुग्णालय म्हणजे रुग्णांसाठी सेवा देणारी जागा आहे. येथे कोणत