दिग्रस: खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराचा शुभारंभ, घंटीबाबा मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ
दिग्रस नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराची सुरुवात आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी झाली. खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते दुपारी १ वाजताच्या सुमारास दिग्रस शहरातील महान तपस्वी श्री घंटीबाबा मंदिर परिसरात प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार, सर्व १२ प्रभागांतील उमेदवार तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिर परिसर घोषणाबाजीने दुमदुमून गेला.