उदगीर: नगरपालिकेचा निर्णय ऐतिहासिक, माजी आमदार गोविंद केंद्रे
Udgir, Latur | Dec 22, 2025 उदगीर नगरपालिका निवडणुकीचा निकाल हा ऐतिहासिक लागला असून,जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला, विधानसभा प्रमाणे उदगीर नगरपालिका निवडणुकीतही मतदारांनी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवत मतदान केल्याने युतीचा दणदणीत विजय झाला,आम्ही आता उदगीरचा विकास करण्यासाठी जोमाने काम करू,जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी काम करणार आहोत, उदगीरच्या मतदार राजांनी युतीच्या उमेदवाराना निवडून दिल्याबद्दल माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी आभार व्यक्त केले