समुद्रपूर: मोहगांव ग्रामपंचायतीमध्ये विकसित भारत रोजगार व आजिविका हमी मिशन २०२५ संबंधी पार पडली विशेष ग्रामसभा
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आली विकसित भारत रोजगार व आजिविका हमी मिशन (ग्रामीण) २०२५ संबंधी जनजागृतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी सरपंच विलास नवघरे तर मुख्याध्यपक रमेश वाघमारे, ग्रामसेवक अखिलेश ढोबळ,तलाठी प्रदिप मानकर यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे सुरुवात करण्यात आली.यावेळी २०२५ या अधिनियमानुसार ग्रामीण भागात रोजगाराचे बळकटीकरण, उपजिविके सबंधी माहिती देण्यात आली.