कन्नड: तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या-आमदार संजना जाधव यांची थेट मंत्र्यांकडे मागणी
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा सादर करण्यासाठी आमदार संजना जाधव यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान आमदार जाधव यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणींचा तपशीलवार आढावा सादर केला.शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.