आर्णी सायकलींग क्लबच्या आठव्या वर्धापन दीनाच्या महालक्ष्मी लाॅन मधिल आयोजित कार्यक्रमामधून अध्यक्षीय भाषणामधून माजी जिल्हा परिषद सदस्य अनंता गावंडे बोलत होते. आर्णी सायकलींग क्लब आज आठ वर्षाचा झाला आहे. यावरुनच अंदाज येतो याचा पाया कीती मजबूत आहे. आर्णी सायकलींग क्लबने शहरात सायकल चालवा, फीट राहा.. हा संदेश आठ वर्षापुर्वी दीला. पाच मित्रांनी एकत्र येवून याची मुहूर्तमेढ रोवली. हळूहळू आपल्या विचाराचे विविध क्षेत्रातील,वयोगटातील लोक जोडत विस्तार केला.