बुलढाणा तालुक्यातील गोधनखेड शिवारात २१ नोव्हेंबर रोजी शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याची दुचाकी क्र.एम एच २८ एसी २९७७ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी शालीकराम शेनफड सुरडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध धाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.