मेहकर: आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतल्या जनसंपर्क कार्यालयात जनतेच्या समस्या जाणून केली सोडवणूक
मेहकर लोणार मतदार संघाचे आ. सिद्धार्थ खरात मेहकर येथील जनसंपर्क कार्यालयात आज विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक समस्येची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना तत्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. जनसंवाद कार्यालय हे जनतेचे प्रश्न सोडविण्याचे केंद्र आहे. नागरिकांनी आपल्या समस्या सकाळी ९:३० ते दुपारी ११:३० या कालावधीत प्रत्यक्ष भेट देऊन बिनदिक्कत मांडाव्यात.