भंडारा: गोसेखुर्द धरणाचे २७ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले, ३०४४.३३ क्यूमेक पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशार
गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे दिनांक ५ जुलै रोजी गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २७ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसेखुर्द धरणाचे २७ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून यामधून ३०४४.३३ क्युमेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.