आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘वॉक विथ वोटर्स इन लो वोटर एरिया’ ही भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. सिव्हील लाईन्ससह शहरातील सर्व १० झोनमध्ये एकाच वेळी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.