पुसद: भारतीय जनता पार्टी, पुसद नगरपरिषद निवडणुकीसाठी सज्ज
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पुसदतर्फे नगरसेवक पदाकरिता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात पार पडल्या. पुसद जिल्हा कार्यालयात झालेल्या या मुलाखत सत्राला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. माजी आमदार तथा जिल्हा निवडणूक प्रमुख श्री. निलय नाईक, जिल्हा महामंत्री श्री. दीपक परिहार, जिल्हा महामंत्री ऍड. आदित्य माने आणि शहराध्यक्ष श्री. निलेश पेंशनवार यांच्या उपस्थितीत ही मुलाखत प्रक्रिया पार पडली.