हिंगणघाट: नंदोरी रोडवरील सावलीवाघ येथे पोलिसांची अवैध दारू वाहतूकीवर कारवाई; १४ लाख ८३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने नंदोरी रोडवरील सावलीवाघ येथे नाकाबंदी करून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या विरोधात मोठी कारवाई करीत दारुसह १४ लाख ८३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक,ठाणेदार देवेद्र ठाकुर व प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांचे आदेशाने डीबी पथकाचे इन्चार्ज सहाय्य पोलीस निरीक्षक दिपक वानखडे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात करण्यात आली आहे.