कन्नड: पिशोर परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागांची आमदार संजना जाधव यांनी केली पाहणी
आज दि १७ स्पटेंबर रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास पिशोर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांना आमदार संजना जाधव यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या अतिवृष्टीत शेतकऱ्यांची पिके, जनावरे तसेच अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधित नागरिकांच्या समस्या ऐकून घेत तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते