पवनी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) डॉ. विजया नंदुरकर यांनी भव्य विजय संपादन केला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार भावना भाजीपाले यांचा ५७८ मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदाची खुर्ची खेचून आणली. या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. डॉ. विजया नंदुरकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवत पहिल्या क्रमांकाची मते घेतली.