कुडाळ: झाराप येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न : प्रयत्न फसल्याने साडे आठ लाखाची रक्कम सुरक्षित
मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप येथे अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यामुळे एटीएममधील साडे आठ लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता देण्यात आली.